पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे दुसरे युनिट कार्यान्वित करण्याचे आयुक्तांचे आदेश

0
628

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या दुसऱ्या युनिटची निर्मिती करण्यात आली असून ते युनिट कार्यान्वित करण्याचे आदेश पोलिस आयुक्त आर. के पद्मनाभन यांनी काढले आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्तालय कार्यान्वित झाल्या पासून गुन्हे शाखेचे एकच युनिट कार्यरत होते. पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर आता गुन्हे शाखेचे दुसरे युनिट देखील सुरु करण्यात आले आहे. या आदेशानुसार युनिट एकच्या वरिष्ठ निरीक्षकपदी सुधाकर काटे, तर युनिट दोनच्या वरिष्ठ निरीक्षकपदी यू.व्ही.तांगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सध्या गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या अधिकारीर आणि कर्मचाऱ्यांची बदली केलेली नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. तर या दोन्ही युनिटचे प्रमुख म्हणून सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे.