पिंपरी-चिंचवडमध्ये डेंगीच्या रुग्णसंख्येत वाढ , प्लेटलेट्स ची मागणी वाढली..

0
268

पिंपरी चिंचवड , दि. ६ (पीसीबी) : डेंगीच्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्लेटलेट्स ची मागणी देखील वाढू लागलीय ..पिंपरी चिंचवडच्या वाईसीएम रुग्णालयाच्या ब्लड बैंक मध्ये दररोज 20 से 25 बैगा प्लेटलेट्स ची मागणी वाढली आहे .नागरिकांनी घराच्या आणि कार्यालयाच्या परिसरात पाणी साठणार नाही, याविषयी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे. मागील काही दिवसांत गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

शहरातील डेंगीच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जुलै महिन्यातील मागील १४ दिवसांत डेंगीचे २५६ संशयित आणि १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. संशयितांची जून महिन्यातील रुग्णसंख्या २९७, तर बाधितांची संख्या १७ होती. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात तापाचे एक हजार ९८२ रुग्ण आढळले. त्यात डेंगीचे संशयित अडीचशेपेक्षा अधिक होते. चिकुनगुनियाचे तीन संशयित रुग्ण आढळले आहेत.पावसाळ्याच्या कालावधीत डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण असते. डासांमुळे हिवताप, डेंगी आणि चिकुनगुनिया आजार पसरतात. हिवताप आजार पसरविण्यास अनॉफिलस डास, तर डेंगी आणि चिकुनगुनिया आजार पसरविण्यास एडिस इजिप्ताय डास कारणीभूत ठरतात.
हिवताप, डेंगी किंवा चिकुनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावल्यास रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंगी, चिकुनगुनियाचे विषाणू त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणुजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हिवताप, डेंगी, चिकुनगुनिया होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागतो. एनॉफिलस अस्वच्छ पाण्यावर आणि एडिस डासाची मादी स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. त्यातून दोन दिवसांनी डास बाहेर पडतात.
कमी मुदतीचा तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, तीव्र सांधेदुखी, अंगावर पुरळ आढळून येणे ही चिकुनगुनियाच्या लक्षणे आहेत. या प्रकारची लक्षणे सात ते दहा दिवसांसाठी असतात. थंडी वाजून ताप येणे, सततचा ताप किंवा एक दिवसाआड ताप; तसेच नंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, बऱ्याच वेळा उलट्या होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत.