दक्षिण कोरियाने क्रीडा ग्राममधील बॅनर हटवले

0
204

टोकियो, दि.१८ (पीसीबी) : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या नियमांचा आदर करत दक्षिण कोरियाने क्रीडा ग्राममध्ये लावलेला बॅनर काढून टाकला. दक्षिण कोरिया ऑलिंपिक समितीनेच ही माहिती दिली.

ऑलिंपिकसाठी दक्षिण कोरिया संघातील सदस्य क्रीडा ग्राममध्ये दाखल झाल्यावर त्यांनी काही बॅनर तेथे लावले होते. त्यावर कोरिया आणि जपान यांच्यात १६व्या शतकात झालेल्या युद्धाचा संदर्भ देण्यात आला होता. आयओसीने हा मजकूर भडकावणारा असल्याचे सांगितले.

आयओसीच्या आदेशानंतर दक्षिण कोरियाने आपले बॅनर काढले, पण त्यापूर्वी त्यांनी जपानकडून उगवत्या सूर्याचे लावलेले झेंडेही काढून टाकण्याचे आश्वासन घेतले.

कोरियाच्या खेळाडूंनी आपल्या रुमच्या बाल्कनीत हे बॅनप फडकावले होते. त्याला जपानच्या काही लोकांनी विरोध केला. या बॅनरवर आमच्याकडेही अजूनही पाच कोटी कोरियन लोकांचे समर्थन आहे असा मजकूर होता. कोरिया आणि जपान यांच्यात झालेल्या युद्धाशी याचा संदर्भ जोडला जातो असे या व्यक्तींचे म्हणणे होते. ते मान्य करून आयओसीने कोरियन खेळाडूंना हे बॅनर काढून टाकण्याचे आदेश दिले होते.