पुण्यातील लष्कर परिसरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन तरुणींची सुटका

0
1530

पुणे, दि. १८ (पीसीबी) – पुण्यातील लष्कर परिसरातील एक फ्लॅटमध्ये देशी-विदेशी तरुणींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना  त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी त्यानुसार संबंधित फ्लॅटवर छापा मारुन उजबेकीस्तान आणि एका भारतीय तरुणीची सुटका केली.

पोलिसांनी याप्रकरणी संबंधित मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेणाऱ्या सचिन साठे, शाबनाझ अल्ताफ मिना (२९, रा.धायरी,पुणे, मु.रा.कर्नाटक) आणि सुरेश लक्ष्मण राठोड (वय ३६, रा.कंधार, नांदेड) या तिघांविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शाबनाझ मिना व सुरेश राठोड यांना पोलीसांनी कारवार्इवेळी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून रोख चार हजार रुपये, दोन मोबार्इल, पिडीत परदेशी मुलीचा पासपोर्ट जप्त केला आहे. पिडीत मुलींना रेसक्यु होम, हडपसर येथे ठेवण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे तपास करत आहेत.