पिंपरीत एअरफोर्समधील अधिकाऱ्याच्या घरात चोरी करणाऱ्या नेपाळी चोरट्यांना पोलिसांनी केले ट्रॅक; गुन्ह्यादरम्यान वापरले तब्बल ८९ सिम कार्ड

0
453

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – मंगळवार (दि.११) माहेशनगर अॅटलास कॉलनी येथील समीर बंगला या भारतीय वायू दलातील कॅप्टनच्या घरात त्यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांना गुंगीचे औषध देऊन तब्बल ३ लाख ३० हजारांचा ऐवज नेपाळी दाम्पत्याने लंपास केला होता. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान हे नेपाळी दाम्पत्य सराईत गुन्हेगार असून त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करुन तब्बल ८९ सिम कार्ड गुन्ह्या दरम्यान वापरल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी प्राची दीपक नेरकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर नेपाळी दाम्पत्याने काशिनाथ महादू नेरकर (वय ७७), सुमन काशीनाथ नेरकर (वय ६७) आणि दीपक काशिनाथ नेरकर (वय ५० सर्व रा.महेशनगर, पिंपरी) या तिघांना जेवणातून गुंगीचे औषध दिले होते.

पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असताना आरोपी नेपाळी दाम्पत्य हे सराईत असून त्यांनी खोटे कागदपत्र सादर करुन तब्बल ८९ सीम कार्ड घेतले. त्यांनी गीता आणि लक्ष्मी या दोन नावांचा सर्वाधिकवेळा वापर केला. तसेच हे दोघे सध्या परराज्यात असून पिंपरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, नेरकर कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून महेश नगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा समीर नावाचा मुलगा एअरफोर्समध्ये होता तो शाहिद झाला. त्यानंतर त्याच नाव त्यांच्या बंगल्याला देण्यात आले. तसेच त्यांचा दुसरा मुलगा दिपक हा देखील एअरफोर्समध्ये कार्यरत झाला. यामुळे एअरफोर्समध्ये कार्यरत असलेल्या जवानाच्या घरात चोरी होत असेल तर सामान्यांच काय, असा सवाल उपस्थित होत आहे.