पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी २ कोटी

0
708

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी येथील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी   सुमारे २ कोटी ११ लाख १० हजार रूपये खर्चास आज (बुधवार) स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात  झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडीगेरी होते.

प्रभाग क्र.४ बोपखेल गणेशनगर सीएमई भिंतीच्याकडील १२ मीटरचा रस्ता विकसित करण्याच्या कामासाठी  सुमारे १ कोटी ४९ लाख ३७ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्र.६ मोशी येथील मोशी जाधववाडी शिवेवरील विकास योजना आराखड्यातील         २४ मीटर डी.पी.चा रस्ता विकसित  करण्यासाठी येणा-या सुमारे २५ लाख रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.