पिंपरीगावात विषारी साप चावल्याने चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

0
809

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – बिळातील विषारी सापाने चावा घेतल्याने एका चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास पिंपरीगावातील वाघेरे कॉलनी  येथे घडली.

कृष्णा अपूर्व नाईक-राठोड (वय ४, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळच्या सुमारास कृष्णा पिंपरी वाघेरे कॉलनी येथील त्याच्या घराशेजारी खेळत होता. खेळताना त्याने एका बिळामध्ये हात घातला. यावेळी त्या बिळातील विषारी सापाने त्याच्या हाताचा चावा घेतला. यामुळे तो बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.