पालिकेच्या घरकुल येथील नवीन इमारतीमध्ये चोरी

0
226

चिखली, दि. १५ (पीसीबी) – चिखली मधील घरकुल येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीमधून अज्ञात चोरट्यांनी वीस हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली.

विजया चंद्रकांत रोडे (वय 53, रा. चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली मधील घरकुल येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नवीन इमारत उभारण्यात आली आहे. त्या इमारतीत लावलेला वीस हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी इमारतीची खिडकी उचकटून चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.