पार्टीसाठी मित्रांसोबत गेलेल्या तरुणीवर बलात्कार

0
600

मुंबई, दि.५ (पीसीबी) – पार्टीसाठी मित्रांसोबत गेलेल्या एका तरुणीवर मित्रांपैकीच एकाने बलात्कार केल्याची घटना विक्रोळी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड येथील राहणारी ३५ वर्षीय तरुणी शनिवारी पार्टीसाठी विक्रोळी येथे आली होती. पार्कसाइट येथील ‘वाधवा टॉवर’मधील एका फ्लॅटमध्ये तिच्या चार मित्रांनी पार्टी आयोजित केली होती. पार्टीनंतर एका मित्राने या तरुणीवर बलात्कार केला. मालाडला घरी परतल्यानंतर तिने हा सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. कुटुंबीयांनी तिला घेऊन मालाड पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार केली. बलात्काराचे गंभीर प्रकरण असल्याने मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो पार्कसाइट पोलिस ठाण्यात वर्ग केला. पार्कसाइट पोलिसांनी तपास करून या प्रकरणातील आरोपी तरुणाला अटक केली. हा प्रकार सुरू होता त्यावेळी इतर मित्र काय करत होते?  त्यांनी बघ्याची भूमिका का बजावली? याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.