पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकच मुख्यमंत्री हवा- रामदास आठवले

0
405

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) –  पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकच मुख्यमंत्री हवा असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. तसेच भाजपाने जी विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीला लोकांचा जनादेश मिळाला आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा एकच मुख्यमंत्री हवा ही आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचाही पाठिंबा आहे असेही आठवले यांनी स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना आणि भाजपा यांच्यातला मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटत नाहीये. अशात आता रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला आमचा पाठिंबा आहे असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे. तर शिवसेनेने समसमान वाटप या सूत्रानुसार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. मात्र रामदास आठवले यांनी भाजपाला पाठिंबा देत पाच वर्षांसाठी एकच मुख्यमंत्री हवा असे म्हटले आहे.

मुख्यमंत्रीपदासहीत सगळे काही ५०-५० हवे असे शिवसेनेने म्हटले आहे. तर शिवसेनेला १३ मंत्रीपद देण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे. हा सगळा पेच सुरु असतानाच रामदास आठवले यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकच मुख्यमंत्री हवा असे म्हटले आहे.