पांडुरंगाने वंचित समाजाला दिलासा दिला, छत्रपती संभाजी राजेंची पहिली प्रतिक्रिया

0
502

मुंबई, दि, १२ (पीसीबी) – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाल शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण वैध असल्याचा निकाल दिला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात पांडुरंगाने वंचित समाजाला दिलासा दिला अशी पहिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्वोच्च न्यायाल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर दिली. मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून मान्यता देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. सरकारी वकिलांनी चांगले काम केले आहे. त्यांनी भक्कमपणे बाजू मांडल्याचे ते म्हणाले.