परीक्षेच्या भितीवर मात करण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करा – प्रा. रवी पिल्ले

0
421

पुणे,दि.१२(पीसीबी) – परीक्षेच्या भिती हि असतील मोठी अडचण असून त्यामुळे केलेला अभ्यास ऐनवेळी आठवत नाही . यावर स्थितीवर मात करण्यासाठी वाचन , चिंतन , प्रकटन या त्रिसूत्रीचा वापर करा आणि पूर्ण आत्मविश्वासाने परीक्षा द्या, परीक्षेची भिती मनातून दूर करून परीक्षेला आपली मैत्री मानली तर यश प्राप्त करणे शक्य आहे, अशा शब्दात प्रा. रवी पिल्ले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

फोरसाईट स्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने दहावीतील विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ” परीक्षेला जाता जाता .. ” या कार्यक्रमात प्रा. पिल्ले बोलत होते. यावेळी प्रा.अर्चना म्हस्के, शिल्पा खाडे, प्रणाली पारवे, उमेश बेल्लूर आदी मान्यवर उपस्थित होते .

प्रा. रवी पिल्ले म्हणाले, कृतिपत्रिकेची भिती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, तणावमुक्त परीक्षेला सामोरे जा, पालकांनी परीक्षेतील गुणांना सामाजिक प्रतिष्ठेचा विषय करून आपल्या अवाजवी अपेक्षेचे ओझे मुलांवर लादण्यापेक्षा घरातील वातावरण आरोग्यपूर्ण राखण्यासाठी प्रयत्न करावा.

प्रा.उमेश बेल्लूर म्हणाले, दहावीची परीक्षा ही बुद्धिमतेची परीक्षा नव्हे तर स्मरणशक्ती व सातत्याची परीक्षा आहे. परीक्षेचे तंत्र आत्मसात करून शेवटच्या दिवसामध्ये योजनापूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. पाल्यांचा तणाव दूर करणे त्याचे शारिरीक, मानसिक आरोग्य कायम राहील याची काळजी घ्यावी , असे मत शिल्पा खाडे आणि व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना म्हस्के यांनी केले तर प्रणाली पारवे यांनी आभार मानले .