पनवेल विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
42
  • पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज (मंगळवारी) खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या महायुतीचे बळ अधिक वाढले आहे.

दि 3 एप्रिल (पीसीबी )- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पनवेल येथील संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. खासदार बारणे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

त्यावेळी शिवसेनेचे पनवेल विधानसभा जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महिला सेनेच्या उरण विधानसभा जिल्हाप्रमुख मेघाताई दमडे, युवा सेनेचे राज्य सचिव तसेच शिवसेनेचे उरण विधानसभा उपजिल्हाप्रमुख रुपेशदादा पाटील, पनवेल तालुका प्रमुख रुपेशदादा ठोंबरे, पनवेल ग्रामीणच्या तालुकाप्रमुख मंदाताई जंगले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पळस्पे जिल्हा परिषद गट तसेच खारघर, चिखले, सांगडे, शिरढोण या भागातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

त्यात सिद्धेश ठाकूर, धीरज कोळी, राकेश मयेकर, अजय म्हात्रे, भारत शेळके, कुणाल शेळके, मयूर ठाकूर, राकेश गायकवाड, नितेश पवार, शुभम पाटील, अनिकेत पाटील, रोहित म्हात्रे, उमेश पंडित, योगेश पंडित, राजेश पवार, सतीश पवार, यशवंत कडव, धनेश पाटील यांचा समावेश आहे.

शिरढोण येथील पूर्णाताई संतोष पाटील, सीमा पाटील, दिपिका भोपी, रोशनी कदम, रजनी पाटील, विमल भोपी, शारदा शेलार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. पनवेल ग्रामीण उपतालुकाप्रमुख क्षेत्र उरण विधानसभा म्हणून पूर्णाताई संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.