‘…..पण तुम्ही मला काही सांगत का नाही?’ मेसेज आले समोर. सुशांतच्या वडिलांना टाळत होत्या रिया आणि तिची मॅनेजर श्रुती मोदी

0
281

मुंबई,दि.११(पीसीबी) : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी तपास कोण करणार याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे. बिहार सरकारच्या विनंतीनंतर सीबीआयने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास कोण करणार यावर कोर्टाकडून निर्णय देण्यात येणार आहे. याप्रकरणाचा महाराष्ट्र सरकार आणि रिया चक्रवर्ती विरोध करत आहेत. अशातच सुशांतच्या कुटुंबियांकडून सतत हा दावा करण्यात येत आहे की, रियाने सुशांतला त्याच्या कुटुंबियांपासून दूर केलं होतं.

काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने सोशल मीडियावर व्हॉट्सॅप चॅटचे काही स्क्रिनशॉर्ट शेअर केले होते. यामध्ये रियाने दावा केला होता की, सुशांतचे त्याच्या बहिणीसोबतचे संबंध फारसे चांगले नव्हते. रिया चक्रवर्तीने स्क्रिनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आणखी काही मेसेजचे स्क्रिनशॉर्ट समोर आले आहेत. ज्यामध्ये सुशांतचे वडील आणि रिया यांच्यात झालेल्या संवादाचे मेसेज समोर आले आहेत. यामध्ये सुशांतचे वडील आपल्या मुलासोबत बोलणं करून देण्याचं रियाला सांगत आहेत. हे सर्व मेसेज गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरचे असल्याचं सांगण्यात येत आहे.

नक्की सुशांतच्या वडीलांनी रियाला पाठवलेले मेसेज काय आहेत :

“जेव्हा तुला कळालचं आहे की, मी सुशांतचा वडील आहे, तर माझ्याशी बोलली का नाहीस. नक्की काय आहे? मैत्रिण म्हणून त्याची काळजी घेत त्याचे उपचारही करत आहेस. त्यामुळे माझंही कर्तव्य आहे की, सुशांतबाबतची सर्व माहिती मला असली पाहिजे. त्यामुळे कॉल करून मला सगळी माहिती दे.’

एवढचं नाही तर, सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी रियाची मॅनेजर श्रुती मोदीलाही मेसेज केला होता. श्रुतीला केलेल्या मेसेजमध्ये सुशांतच्या वडीलांनी लिहिलं होतं की, ‘मला माहिती आहे की, सुशांतची सर्व कामं तू पाहतेस. तो आता कोणत्या परिस्थितीत आहे, त्यासाठी बोलायचं होतं. काल सुशांतसोबत बोलणं झालं होतं. त्यावेळी तो म्हणाला होता की,’ मी खूप अस्वस्थ आहे.’ आता तूच विचार कर की, एका वडीलांना त्यांच्या मुलाची किती चिंता असेल. त्यामुळेच तुझ्याशी बोलायचं होतं. आता तू बोलत नाहीस, त्यामुळे मला मुंबईला जायचं आहे. फ्लाइटचे तिकीट पाठव.”

सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियावर आरोप लावत पाटणा येथे सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केला आहे की, रियानेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुशांतपासून दूर केलं होतं. रियाची चौकशी होणं गरजेचं आहे.