‘बुलाती है मगर जाने का नहीं’- प्रसिद्ध शायर राहत इंदौरी करोना पॉझिटिव्ह

0
234

देश,दि.११(पीसीबी) – प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांना देखील करोनाचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. राहत इंदौरी हे करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी या अगोदर धावून आले होते. त्यांनी करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्यास स्वतःच घर देखील वापरण्यास देण्याची तयारी दर्शवली होती.

“कोविडची सुरुवातीची लक्षणं आढळून आल्याने मी काल तपासणी करून घेतली, ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अरविंदो रुग्णालयात मी उपचार घेत आहे. प्रार्थना करा की लवकरात लवकर मला या आजाराला हरवता येईल. आणखी एक विनंती आहे, कृपया कोणीही मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करू नये, माझ्या प्रकृतीबाबतची माहिती आपल्याला ट्विटर व फेसबुकद्वारे मिळत राहील.” असे त्यांनी ट्वटिद्वारे सांगितले आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी त्यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर या शेरनं अक्षरशः धुमाकूळचं घातला होता.