अज्ञातांकडून भाजप खासदाराच्या वाहनावर हल्ला; खासदार गंभीर जखमी

0
519

बैरकपूर, दि. १ (पीसीबी) – पश्चिम बंगालमधील बैरकपूर मतदारसंघाचे भाजपाचे खासदार अर्जुन सिंह यांच्या गाडीवर आज (रविवारी) नॉर्थ २४ परगना येथे हल्ला झाला. ज्यामध्ये त्यांच्या गाडीची मोठ्याप्रमाणात थोडफोड करण्यात आली असून त्यांच्या डोक्यालाही दुखापत झाला आहे.

तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. टीएमसीचे कार्यकर्ते भाजपा कार्यालयचा ताबा घेऊ इच्छित होते, असेही अर्जुन सिंह यावेळी म्हटले.

खासदार अर्जुन सिंह यांनी म्हटले आहे की, माझ्यावर हल्ला करण्यात आला आणि माझ्या गाडीची तोडफोड करण्यात आली. या घटनेचा लोक शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत होते. मात्र पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी माझ्या डोक्यावर लाठीमार केला व माझ्याशी असभ्य भाषा वापरत वर्तवणूक केली. शिवाय माझ्या घरावरही हल्ला केला जात आहे.