पंतप्रधान मोदींना ‘२०१८ सेऊल पीस प्राइझ’ हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

0
625

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  ‘२०१८ सेऊल पीस प्राइझ’  हा  आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  ‘द सेऊल पीस प्राइझ कमिटी’ने या पुरस्काराची  घोषणा केली आहे.मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला  आहे.

आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतिक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये योगदान, भारतातील लोकांच्या विकासाला चालना देणे, या कामगिरीची दखल घेत मोदींची या पुरस्कारासाठी निवड केली आहे, असे  द सेऊल पीस प्राइझ कमिटीने म्हटले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतल्याने आणि समाजाच्या एकत्रिकरणाच्या प्रयत्नाद्वारे मोदींनी भारताच्या आर्थिक विकासासाठी प्रयत्न केले आहेत. याचीही मोदींना पुस्कार जाहीर करताना  नोंद घेतली आहे, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.