पंतप्रधानपदासाठी त्यांच्याकडे ६ जण रांगेत – राम माधव

0
680

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – स्टॅलिन यांच्याशिवाय महाआघाडीच्या नेत्याचे नाव निश्चित करण्यासाठी कोणी तयार नाही. पंतप्रधान होण्यासाठी त्यांच्याकडे ६ लोक रांगेत उभे आहेत, असा टोला भाजप नेते राम माधव यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि महाआघाडीला लगावला आहे.  

माधव म्हणाले की, राहुल काँग्रेसचे नेते असून त्यांनी निश्चित केले पाहिजे की, त्यांचे नेतृत्व पक्षासाठी चांगले आहे की, नाही. आम्ही काँग्रेससाठी त्यांच्या नेतृत्वावर कसे बोलू शकतो. नुकताच झालेल्या निवडणुकीत त्यांनी यश मिळवले, याबाबत काहीच शंका नाही. विधानसभा निवडणुकीत यश मिळाले, म्हणून जर राहुल पंतप्रधानपदासाठी पर्याय असतील, तर महाआघाडीची गरजच नाही, असे ते म्हणाले.

राम मंदिराच्या अध्यादेशाचा मार्ग खुला आहे. मात्र, आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर ४ जानेवारीरोजी सुनावणी झाली आहे. फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण आणून लवकरच हे संपेल अशी आशा आहे. जर असे झाले नाही तर दुसरा पर्याय शोधावा लागेल, असेही ते म्हणाले.