नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून चिखलीतील तरुणीला ६२ हजारांचा गंडा

0
733

चिखली, दि. २४ (पीसीबी) – नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी चिखलीतील एका २५ वर्षीय तरुणीकडून वेळोवेळी एकूण ६० हजार २०० रुपये घेतले तसेच नोकरी न लावता आणि घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली. ही घटना ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुनाल सिंग, अनुराग पाठक, अर्पित जैन आणि इतर दोन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान आरोपी कुनाल सिंग, अनुराग पाठक, अर्पित जैन आणि त्यांच्या दोन साथीदारांनी फिर्यादी तरुणीला वारंवार फोन करुन नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले. तसेच रजिस्टेशन फी, इन्टरव्हयु ट्रेनिंग फी अशा वेगवेगळ्या कारणासाठी तब्बल ६० हजार २०० रुपये घेतले. मात्र आरोपींनी तिला नोकरीला लावले नाही. तसेच घेतलेले पैसेही परत केले नाही. यामुळे पाचही आरोपींविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.