धक्कादायक: आई-वडिलांनी नवजात बाळाला टाकले रेल्वेच्या कमोडमध्ये

0
984

अमृतसर, दि. २४ (पीसीबी) – अज्ञात आई-वडिलांनी पोटच्या नवजात बाळाला रेल्वेच्या कमोडमध्ये मरण्यासाठी टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.२३) हावडाहून अमृतसरला पोहचलेल्या ट्रेनमधून समोर आली. या भयंकर घटनेमुळे पंजाबमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हावडा मेलच्या एसी डी-३ डब्यात एका नवजात बाळाला ओढनीमध्ये गुंडाळून ट्रेनच्या कमोडमध्ये मरण्यासाठी फेकून देण्यात आले होते. सफाई कर्मचाऱ्याने याबद्दल तात्काळ माहिती अधिकाऱ्यांना कळवली. जेव्हा बाळाला कमोडमधून बाहेर काढण्यात आले तेव्हा बाळाचा श्वास सुरू होता. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सगळ्यात धक्कादायक म्हणजे ओढणीमध्ये गुंडाळलेले हे नवजात बाळ फ्लशमध्ये अडकले होते. सध्या या बाळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही लोक आई-वडिलांनीच त्या बाळाला कमोडमध्ये टाकले, असे बोलत आहेत. याप्रकरणी अमृतसर पोलीस संपूर्ण प्रकाराचा कसून तपास करत आहेत.