“माडिया शिकू या”पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

0
532

पुणे,  दि. २९ (पीसीबी) –  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या “माडिया शिकू या” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते सोमवार दि. १ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवाजीनगर, घोले रोड येथील पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात होणार असल्याची माहिती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे यांनी दिली पत्रकाव्दोर दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे, या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ किरण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. माडिया ही महाराष्ट्रातील तीन आदिम जमातीपैकी एक जमात आहे. ही जमात प्रामुख्याने महाराष्ट्राच्या गडचिरोली आणि शेजारील छत्तीसगड मधील बस्तर भागात आढळून येते. माडिया ही बोलीभाषा असून या भाषेला लिपी नाही. हे अभ्यासपुस्तक गडचिरोली जिल्ह्यात विविध स्तरात काम करणाऱ्या व माडिया शिकू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी उपयोगी पडावे व महाराष्ट्राला समृध्द आदिवासी भाषेची ओळख व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहीले आहे. या पुस्तकाचे लेखन मंजिरी परांजपे, ऋजुता टिळेकर, मैथिली देखणे-जोशी, ख्रिस्तीन फरायस यांनी केले आहे.