निर्मला सीतारमण यांच्याविषयीच्या विधानाप्रकरणी महिला आयोगाची राहुल गांधींना नोटीस

0
735

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केले आहे’, असे विधान करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानमधील एका सभेत  संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांचा अवमान केला होता. या विधानाप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने राहुल गांधी यांच्याकडे खुलासा मागितला असून नोटीस बजावली आहे.

राहुल यांच्या या विधानावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त करून पुरुषप्रधान मानसिकतेतून हे विधान केल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी महिलांना कमकुवत मानतात का, असा सवाल करत, राहुल गांधींचे विधान महिलांची निंदा करणारे आणि अपमानजनक असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आमच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातूनच सुरू होतो’, असे सांगत,  पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा भलत्याच दिशेकडे भरकटवू नये आणि उत्तर द्यावे’, असे आवाहन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केले आहे.