मुख्यमंत्र्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे कॉफीटेल हॉटेलत नाक घासत का गेले ? – जयंत पाटील

0
672

रायगड, दि. १० (पीसीबी) – शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपवर हल्ला चढवण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शिवसेना – भाजप युती होण्याची शक्यता दुरापास्त वाटत असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुप्तभेटीबाबत गौप्यस्फोट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.