निजामुद्दीनच्या कार्यक्रमातील महाराष्ट्रातील १४०० पैकी १३००जणांना क्वॉरंटाईन करण्याचे काम सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे

0
303

 

मुंबई, दि.२ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पत्रकार परिषद घेतली आणि याबाबत माहिती दिली.

दिल्लीतील निजामुद्दीनच्या मरकजच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील १४०० लोक सहभागी झाले होते. यापैकी १३०० जण सापडले असून त्यांना क्वॉरंटाईन करण्याचे काम सुरु आहे, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या ‘मरकज’ कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या कार्यक्रमला राज्यातून अनेकजण सहभागी असल्याची माहिती मिळाल्याने राज्य सरकार अलर्टवर होते.निजामुद्दीनला तब्लिग जमातच्या कार्यक्रमाला देशभरातून लोक गेली होती. महाराष्ट्रातूनही जवळपास १४०० लोक गेली होती. यात प्रत्येक जिल्ह्यातील काही लोकं गेली होती. त्यापैकी १३०० लोकांना क्वॉरंटाईन करण्याचं काम सुरु आहे. त्यांचं ट्रेसिंग झालेलं आहे. सामाजिक संस्था, एनएसएसचे कार्यकर्ते, होमगार्ड यांच्या सर्वांच्या साहाय्याने त्यांना विश्वासात घेऊन क्वॉरंटाईन करणार असल्याचं राजेश टोपे म्हणाले. दरम्यान, राज्यात सध्या पाच हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल. तसेच ब्लड घेतल्यावर केवळ ५ मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारीही रॅपिड टेस्ट आहे,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.