निगडीत सेल्समेनचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून

0
547

निगडी, दि. ५ (पीसीबी) – निगडी अजंठानगर येथील एका पान टपरीजवळ उभा असेल्या सेल्समेनचा दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (शुक्रवार) दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान घडली.