निगडीत जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

0
669

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – निगडीतील मधकुर पवळे उड्डाण पुलाजवळील व टिळक चौकात  जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. आज (सोमवार) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने सगळीकडे पाणीचपाणी दिसत होते.

यामुळे यमुनानगर परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. तर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन धारकांना पाण्यातून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागली. ऐन पाणी टंचाईच्या काळात पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

पवना धरणातील पाणीसाठा घटल्याने पिंपरी-चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जलवाहिनी फुटून पाण्याची नासाडी होत आहे. या प्रकारावर नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.