निगडीत चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून महिलेला ७३ लाखांचा गंडा

0
552

निगडी, दि. ३ (पीसीबी) – सरकारी योजन, शेअर्स, मुच्युअल फंड तसेच बॉन्डमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून एका ४८ वर्षीय महिलेला तिघाजणांनी तब्बल ७३ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. ही घटना डिसेंबर २०१७ ते एप्रिल २०१९ दरम्यान निगडी येथे घडली.

याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शितल प्रदिप कुंभार (वय ३०, रा. स्वारगेट) आणि तिच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शितल आणि तिच्या दोघा सहकाऱ्यांनी निगडी येथील ४८ वर्षीय महिलेला डिसेंबर २०१७ पासून सरकारी योजन, शेअर्स, मुच्युअल फंड तसेच बॉन्डमध्ये गुंतवणुक करण्यास भाग पाडून चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवले. यासाठी आरोपींनी फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी एकूण ७३ लाख रुपये उकळले. मात्र बरेच दिवस उलटून देखील आरोपींनी त्यांना त्यांचा मोबदला दिला नाही. तसेच गुंतवलेली रक्कम देखील परत केली नाही. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर.एम. भोये तपास करत आहेत.