माझा मुलगा २४ -२५ वर्षाचा नाही, त्याला भाषण करता येते; विखे- पाटलांचा अजित पवारांना टोला

0
890

अहमदनगर, दि. ३ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार आपल्या पहिल्या अडखळत्या भाषणावरून ट्रोल होऊ लागले असतानाच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना टोला लगावला आहे. माझा मुलगा २४ -२५ वर्षाचा नाही, त्याला भाषण करता येते, असे विखे-पाटील यांनी म्हटले आहे.   

अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार आपल्या पहिले  भाषण करताना  काहीसे  भांबावलेले होते. यावरून काँग्रेस  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी  अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. माझा मुलगा २४-२५  वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येते.’ असे म्हणत विखे पाटील यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

पार्थ पवार अडखळत्या भाषणामुळे  सोशल मीडियावर चांगलेच  ट्रोल झाले होते. यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठेच लागल्यानंतर शिकत जाईल, असे म्हटले होते. एकंदरीत पार्थ आपल्या पहिल्या भाषणामुळे चर्चे विषय ठरले होते.