…नाही डांबर फासलं थोबाडाला तर बघच; रुपाली चाकणकरांचा गिरीश महाजनांना इशारा

0
11103

पुणे, दि. २० (पीसीबी) – सत्तेमध्ये असल्याने  माजला आहात, सत्ता जाईलच, त्यावेळी रस्त्यावरुन चालून दाखवा, नाही डांबर फासलं थोबाडाला तर बघ, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वादात आता रुपाली चाकणकर यांनी उडी घेतली आहे. ‘दारुच्या बाटल्यांना बायकांची नावं द्या म्हणजे खप वाढेल, असे विधान महाजनांनी केले होते, याची आठवण  चाकणकर यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून केली  आहे.  आपली कर्तृत्व महाराष्ट्रातील मायमाऊली आणखी विसरली नाही, असेही  त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला यश मिळवून देण्यात गिरीश महाजन यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक निवडणुका जिंकल्याने आत्मविश्वास आलेल्या महाजन यांनी मला पक्षाने परवानगी दिली, तर पवारांची बारामती देखील जिंकून दाखवतो, असे वक्तव्य नुकतेच केले आहे. या विधानाचा चाकणकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे.