…नाहीतर मीच सरकारकडे बघतो; शरद पवारांचा इशारा  

0
544

सातारा, दि. १२ (पीसीबी) – शेतकऱ्यांच्या प्रती जनावराला ९० रुपये अनुदान आहे. हे १२५ रुपये करावे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे नाहीतर मी सरकारकडे बघतो, असा इशारा राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

राज्यातील भीषण दुष्काळी   परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी  शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत. आज (रविवार)  ते साताऱ्यामध्ये  बोलत होते.

यावेळी त्यांनी साताऱ्यातील चारा छावणीला भेट दिली. त्यावेळी आमचे सरकार होते तेव्हा आमच्या ७६ छावण्या होत्या. मात्र आता भाजपा सरकारच्या काळात २६ छावण्या आहेत,  असे  पवार यांनी  सांगितले.  आम्ही  आता राजकारण करणार नाही. मात्र याच शेतकऱ्यांच्या प्रती जनावाराला ९० रूपये अनुदान आहे. ते अनुदान १२५ रूपये करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे,  असे पवार म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोनवरून दुष्काळाची माहिती घेत असल्याची  बातमी मला समजली. फोनवरून कोणीही माहिती घेवू शकते, मात्र सरकारने राज्यभरात फिरून परिस्थिती समजून घ्यायला हवी, असे   पवार  म्हणाले.