विधानसभा निवडणुकीत राम शिंदेंची जागा दाखवून देऊ – रोहित पवार 

0
676

अहमदनगर, दि.१२ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप नेते व राज्याचे मंत्री  राम शिंदे यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी दिला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद  मेळाव्यात पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, राम शिंदे यांना आगामी काळात स्वतःचे पद धोक्यात असल्याची चिंता लागली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकी दरम्यान त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडला नाही.  लोकसभेचा प्रचार सोडून ते तालुक्यातच फिरत राहिले.  शिंदे यांनी माझी धास्ती घेतली असल्याने ते लोकसभेचा प्रचार सोडून तालुक्यातच फिरत राहिले, असा टोलाही  पवारांनी लगावला.

दरम्यान, भाजपचे अनेक नेते आपल्या संपर्कात असल्याचा दावा  रोहित पवार यांनी  यावेळी केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.  रोहित पवार जामखेड मतदारसंघातून विधानसभा लढवणार आहेत. त्यांनी या मतदारसंघात आपला संपर्क वाढविला आहे. येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.