नाशिक घटनेची पुनरावृत्ती, गोव्यातील रुग्णालयात ऑक्सिजन टँक गळती; २४ रुग्णांचा मृत्यू

0
720

गोवा,दि.११(पीसीबी) – देश सध्या कोरोना साथीविरुद्ध लढा देत आहे. दररोज नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारची चिंता वाढवत आहेत. अशा परिस्थितीत रूग्णालयात ऑक्सिजनची कमतरता आहे. दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष थांबत नाही. नुकत्याच महाराष्ट्रातील नाशिक रूग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याची घटना ताजी असताना तसाच काहीसा प्रकार आता दक्षिण गोव्याच्या जिल्हा रुग्णालयात घडला आहे. नाशिक दुर्घटनेत ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला.

दक्षिण गोव्याच्या जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टाकीमधून गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.

ऑक्सिजन टाकी फुटल्यानंतर रुग्णालयात खळबळ उडाली होती. संपूर्ण रुग्णालय आवारात ऑक्सिजन वायूचा फैलाव झाल्याने सर्वत्र धुरच धूर झाला आहे. मात्र, परिस्थिती कशी आहे याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.