नाशिकच्या मुथूट फायनान्सवर दरोडा; एकाचा मृत्यू दोघे गंभीर

0
368

नाशिक, दि. १४ (पीसीबी) – उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्समध्ये आज (शुक्रवार) सकाळ अकराच्या सुमारास चौघा दरोडेखोरांनी गोळीबार करत दरोडा टाकला. या घटनेत एका ऑडिटरचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी आहेत.

संजू सॅम्युअल असे मृताचे नाव असून तो ऑडिटर होता. दरोडेखोरांच्या हल्ल्यात संजू सॅम्युअल यांच्या शरीरात ३ गोळ्या घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर कैलास जैन आणि राजू देशपांडे अशी जखमींची नावे आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.