नाना पाटेकर आणि अमित शहा यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधान

0
460

दिल्ली, दि. २० (पीसीबी) – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

यामुळे आता नाना पाटेकर राजकारणात एंट्री करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अभिनयासोबतच नाना पाटेकर ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करत आहेत. मात्र अमित शहांची भेट घेतल्याने नाना आता राजकीय क्षेत्रात येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच या भेटी मागचे कारण देखील अस्पष्ट आहे. यामुळे नाना पाटेकर आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशी चर्चा जोर धरु लागली आहे.