नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंडी यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर

0
644

नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – लोकसभेसाठी काँग्रेसने बुधवारी (दि. १३) रात्री महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर केले आहेत. नागपूर मतदारसंघात नाना पटोले, गडचिरोली- चिमूर मतदारसंघात डॉ. नामदेव उसेंडी, उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात प्रिया दत्त, दक्षिण मुंबई मतदारसंघात मिलिंद देवरा आणि सोलापूर (राखीव) मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपमधून राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले नागपूर मतदारसंघात नितीन गडकरी यांच्याशी लढत देतील. तसेच अंतर्गत गटबाजीमुळे नाराज प्रिया दत्त व देवरा यांचाही राहुल गांधी यांनी पहिल्या यादीत समावेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ७ मार्च रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात १५ उमेदवारांचा समावेश होता. आता बुधवारी रात्री दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यात २१ उमेदवारांचा समावेश असून, त्यातील ५ उमेदवार हे महाराष्ट्रातील आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीमधून, तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.