नागपुरात तृतीयपंथीयांसाठी गृहप्रकल्प

0
350

नागपूर, दि. ११ (पीसीबी) : नागपुरात तृतीयपंथीयांसाठी गृहप्रकल्प तयार होत आहे. तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रातील हा पहिलाच गृहप्रकल्प आहे. यामध्ये केवळ साडेसहा लाखात तृतीयपंथीयांना घर मिळणार आहे. तृतीयपंथीयांना अनेकजण घर भाड्याने देत नाहीत. त्यामुळं एकाच खोलीत त्यांना दाटीवाटीने राहावे लागते. त्यांना त्यांचे हक्क मिळायला हवेत. चांगले आयुष्य जगण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे. याच उद्देशाने नासुप्रने हा प्रकल्प हाती घेतला आहे. तृतीयपंथीयांसाठी महाराष्ट्रातील पहिला गृहप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठीमौजा चिखली येथे २५२ घरकुले उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

योगी सरकार हॅकर्सच्या निशाण्यावर; मुख्यमंत्री कार्यालयानंतर महत्त्वाचे ट्विटर अकाऊंट हॅक
नऊ लाखांच्या घरांसाठी अनुदान मिळावे, यासाठी राज्यस्तरावर बैठक घेण्यात आली. यात ६ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान मिळावे, अशी विनंती नागपूर सुधार प्रन्यासकडून करण्यात आली. त्यामुळे अ‌वघ्या साडेसहा लाख रुपयांत फ्लॅट मिळेल. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. नासुप्रच्या घरकुलाची किंमत १३ लाख रुपये निर्धारित करण्यात आली आहे. मात्र, तृतीयपंथीयांसाठी जमिनीची किंमत वजा करून केवळ बांधकामाच्या खर्चात म्हणजे ९ लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याचा नासुप्रचा मानस आहे.
मात्र, ही किंमतही देणे तृतीयपंथीयांना शक्य नसल्याने सामाजिक न्याय विभागाच्यावतीने प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणे प्रत्येक फ्लॅटसाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळावे, अशी विनंती नासुप्रकडून करण्यात आली आहे. त्यामुळं या दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकाला हक्काचा निवारा।मिळणार आहे.