नगरसेवक शैलेष मोरे कोरोना पॉझिटिव्ह

0
409

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – कोरोना बाधित राजकीय कार्यकर्त्यांची संख्या रोज वाढतेच आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नंतर एक एक करत पाच नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाली. भाजपचे नगरसेवक शैलेष मोरे तसेच नगरसेविका करुणा चिंचवडे यांचे पती शेखर चिंचवडे यांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. आमदार महेश लांडगे यांच्या संपर्कातीन १४७ नागरिकांचे सुरवातीला निगेटिव्ह होते ते आता पॉझिटिव्ह आहेत, असे सांगण्यात आले.

नगरसेवक मोरे यांच्या प्रभागात आनंदनगर झोपडपट्टी आहे. तिथे सुमारे २०० पर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्यामुळे सुमारे दीड महिना हा परिसर सील करून ठेवण्यात आला. या भागातील कुटुंबांना धआन्य, किराणा वाटपाचे काम स्वतः मोरे यांनी केले. त्यावेळी नागरिकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधी झाली असावी अशी शक्यता आहे. शेखर चिंचवडे यांचाही लोकसंपर्क असतो. कोरनाच्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या गाठीभेटी सुरू होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले. त्यानंतर बहुतांशी लोकप्रतिनिधींनी धास्ती घेतली आहे. नगरसेवकांपैकी निलेश बारणे, चंदा लोखंडे, उत्तम केंदळे यांना बाधा झाली आहे. त्याशिवाय अनुप मोरे, माजी नगरसेवक राजू रामा लोखंडे यांचाही कोरोना ग्रस्तांमध्ये समावेश आहे. दापोडीतील नगरसेवकाच्या घरातील सहा जणांना बाधा झाली होती.