नगरसेवक शत्रुघ्न काटेंच्या संकल्पनेतून पिंपळेसौदागरमध्ये इ-स्कूटर धावणार

0
613

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पुन्हा एक पाऊल स्मार्ट सिटी कडे वळवत ग्रीन सौदागर क्लिन सौदागर हा ध्यास मनात घेऊन प्रथमच पिंपळे सौदागर येथे इ-स्कुटर सेवा कार्यरत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पंधरा दिवसात प्रथम टप्यात ट्रायल बेसेसवर पिंपळेसौदागरमधील नागरिकांसाठी २० इ-स्कूटरचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेवक काटे यांनी दिली.

ही इ-स्कूटर Android App द्वारे चालु किंवा बंद करता येते. स्कूटर इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे एका तासात ६० किलोमीटर चालवता येते. या इ-स्कुटरला चार्जिंगसाठी ४ ते ५ तास लागतात. इ-स्कुटरची टॉप स्पीड ही २५ किलोमीटर प्रति तास आहे. वाढती महागाई आणि वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी ही संकल्पना प्रथमच पिंपळे सौदागरमधील नागरिकांसाठी राबवण्याचे ठरविले आहे.

इ-स्कूटर चालवण्यासाठी पाहिले १५ मीनिट राईड फ्री असणार आहे. त्यानंतर इ-स्कुटर चालवण्यासाठी दीड रुपये प्रति मिनिट दर आकारले जाणार आहे. युपीआय अॅपद्वारे पैसे भरून इ-स्कूटरचा आनंद नागरिकांना घेता येईल. पिंपळे सौदागरमधील नागरिकांच्या स्वास्थ्य व आरोग्याची काळजी घेत पिंपळे सौदागरमध्ये अनेक ठिकाणी असलेले सायकल पॉईंट आहेत त्याच ठिकाणी या इ-स्कुटर पॉईंट आणि इ-स्कुटर चार्जिंग पॉईंट असल्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.