नगरसेवक नामदेव ढाके यांना महापौर करा; शहरातील खान्देशीय संघटनांची मागणी

0
668

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये विविध क्षेत्रात काम करणारे खान्देशाचे सुपूत्र नगरसेवक नामदेव ढाके यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी निवड करावी, अशी मागणी शहरातील विविध खान्देशीय संघटनांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष रविंद्र वऱ्हाटे, विजया जंगले, शंकर पाटील, शंकर पाटील, निना खर्चे, अमोल पाटील, बी. डी. पाटील, पी. के. महाजन, विजया मानमोडे, किरण पाचपांडे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले, पिंपरी-चिंचवडमधील सांगवी, भोसरी, निगडी, चिंचवड, वाल्हेकरवाडीसह विविध परिसरात खान्देशातील उद्योजक, कामगारवर्ग काम करतात. नगरसेवक नामदेव ढाके गेल्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ राहून काम करतात. त्यांचा यात खारीचा वाटा आहे. महापालिकेत भाजपची आल्यानंतर भाजपचे पहिले महापौर म्हणून त्यांचे नाव चर्चिले गेले होते. पण तसे झाल नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा दिला होता. त्यानुसार भाजपने नामदेव ढाके यांना महापौर करून खान्देशीयांना न्याय द्यावा, अन्यथा आगामी निवडणुकीत खान्देशवायीयांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी बोलतांना सांगितले.