धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवणे हा संघाचा निर्णय-  रवी शास्त्री

0
328

लंडन, दि. १३ (पीसीबी)  विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंह धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर टीका होत असतानाच टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी अखेर मौन सोडले आहे. धोनीला सातव्या क्रमांकावर खेळवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचाच होता, असे स्पष्टीकरण शास्त्रींनी दिले आहे.

धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय संपूर्ण संघाचा होता. सर्व खेळाडूंचे त्यावर एकमत होते. विशेष म्हणजे हा काही मोठा निर्णय नव्हता. हा साधारण निर्णय होता. दुसरे असे की धोनी वरच्या क्रमांकावर खेळायला यावा आणि लवकर बाद व्हावा असे तुम्हाला वाटते का?, असा सवालही शास्त्रींनी केला. सेमीफायनलमध्ये भारताला अवघ्या १८ धावांनी पराभूत व्हावे लागले होते. सेमीफायनलच्या सामन्यात धोनीने ५० धावा केल्या होत्या, पण धावा घेण्याच्या नादात तो पायचीत झाला आणि भारताची जिंकण्याची सर्व आशा मावळली. त्यामुळेच सुनील गावसकर यांच्यापासून ते सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीनेही धोनीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते.

त्यावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शास्त्री यांनी हा खुलासा केला. धोनीच्या अनुभवाचा आम्हाला नंतर फायदा करून घ्यायचा होता. तो मॅच विनर आहे. त्याचा असा उपयोग करून घेतला नसता तर तो गुन्हाच ठरला असता. संपूर्ण संघाचे त्यावर एकमत होते, असे शास्त्री म्हणाले.