धुळ्यात कंटेनर -बसचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २० जखमी

0
431

धुळे, दि. १९ (पीसीबी) – धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस चालकासह दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी आहेत. जखमी प्रवाशांतील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.

रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास औरंगाबाद – शहादा बस (एमएच २० बीएल ३७५६) आणि ट्रकमध्ये धडक झाली. या अपघातात बसचालक मुकेश पाटीलसह दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस चालकच्या बाजूला जोरदार धडक बसल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात बसचा चक्काचूर झालेला आहे.

अपघाताताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली. गावकऱ्यांनी तात्काळ जखमींची मदत केली. जखमींना दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.