धुळ्यात एसटीबस आणि ट्रकचा भीषण अपघात; दहा जणांचा मृत्यू २० गंभीर

0
341

धुळे, दि. १९ (पीसीबी) – शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री एसटी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालकासह दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास औरंगाबाद – शहादा एसटी बस (क्र.एमएच/२०/बीएल/३७५६) आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बसचालक मुकेश पाटीलसह दहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर २० जण गंभीर असल्याचे समजते. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस चालकच्या बाजूला जोरदार धडक बसल्यामुळे हा अपघात झाल्यीच प्राथमिक माहिती आहे. अपघाताताची माहिती मिळताच स्थानिकांनी तात्काळ जखमींची मदत केली. जखमींना दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.