धायरी येथील पुलावरून पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह महिला वाहून गेली    

0
717

पुणे, दि. २६ (पीसीबी) – पुण्यात बुधवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे  धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जाताना, पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह एक महिला वाहून गेली.   सनसिटीच्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर या महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे  परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अमृता आनंद सुदामे (रा. नांदेड सिटी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नांव आहे.

अमृता सुदामे यांच्या बहीण निशा वायकर यांनी सांगितले की,  अमृता ही नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजता कामास गेली होती, कामावरून १० वाजता घराकडे निघाली.  ती साधारण साडेदहा वाजता घरी येते. मात्र ती घरी न आल्याने तिचा शोध आसपासच्या भागात घेण्यात आला.

याबाबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती देण्यात आली.  त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केल्यावर तब्बल ८ तासांनंतर ‘सनसिटी’च्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर अमृता यांचा मृतदेह आढळून आला.  दरम्यान,  अमृता यांच्या पश्चात  दोन मुली,  पती असा परिवार आहे.