सासूने सुनेच्या बँक खातून लंपास केले ३१ लाख

0
429

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – सासू व सुनेच्या संयुक्त बँक खात्यातून सासूने ३१ लाख आठ हजार परस्पर काढून खर्च केले. या प्रकरणी सुनेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी सासू विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २००६ ते २००९ दरम्यान घडला.

मंगल जगताप (वय ६५, रा. निगडी प्राधिकरण) असे सासूचे आहे. तर आरती जगताप (वय ४३) असे सुनेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती जगताप व मंगल जगताप याचे सेंट्रल बँक ऑफ इंडीयाच्या निगडी प्राधिकरण शाखेत संयुक्त खाते होते. या खात्यातून मंगल जगताप यांनी परस्पर पैसे काढून ते खर्च केले. असे आरती यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.