धक्कादायक: सिनेमा बघायला पैसे न दिल्याने मुलाने वडिलांना पेटवले

0
946

वेलोरी, दि. ११ (पीसीबी) – तमिळनाडूतील वेलोरी येथे दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेता अजितच्या चाहत्याने सिनेमा बघायला पैसे दिले नाही म्हणून वडिलांनाच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जखमी झालेले वडिल सुदैवाने बचावले आहेत.

पांडियन असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर अजित कुमार (वय २०) असे वेलोरी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित कुमार याने वडिल पांडियन यांच्याकडे दक्षिणेतील प्रसिध्द अभिनेता अजित याचा ‘विश्वासम’हा चित्रपट पाहण्यासाठी पैसे मागितले होते. पण वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे अजितला राग आला आणि त्याने वडिलांना पेटवून दिले. या घटनेत त्याचे वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांना वाचवण्याचा पुरेपर प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी अजितला अटक केली आहे.