धक्कादायक: मोबाईल फोनचा पासवर्ड न सांगितल्याने पत्नीने पतीला जिवंत जाळले

0
2030

जकार्ता, दि. १८ (पीसीबी) – पतीने मोबाईल फोनचा पासवर्ड न सांगितल्याने पत्नीने त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना इंडोनेशियाच्या वेस्ट नूसा टेंगाराच्या ईस्ट लोम्बाक रिजन्सीमध्ये घडली.

डेडी पूरनामा (वय २६) असे मृत पतीचे नाव आहे. तर इल्हाम चाहयानी (वय २५) असे पोलिसांनी अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, डेडी त्याच्या घराच छप्पर दुरुस्त करत होता. त्यावेळी त्याची पत्नी इल्हाम चाहयानीने त्याच्या मोबाईल फोनचा पासवर्ड मागितला. पण डेडीने पासवर्ड देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. यावेळी डेडीने इल्हामला मारहाण केली. पण याचवेळी इल्हामने त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जाळले. डेडी पूरनामाच्या शरीराचा वरचा भाग पूर्णत: भाजला होता. दोन दिवसांनी त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी चाहयानीला अटक केली आहे.