धक्कादायक: नालासोपाऱ्यातील शस्त्रसाठा पुण्यातून नेण्यात आला; एटीएसच्या हाती सीसीटीव्ही फुटेज

0
1385

पुणे, दि. २ (पीसीबी) – नालासोपारा येथे पकडण्यात आलेला प्रचंड मोठा शस्त्रसाठा पुण्यातून नालासोपाऱ्यात आणला असल्याची धक्कादायक माहिती (एटीएस) दहशतवादविरोधी पथकाच्या तपासा दरम्यान समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील एटीएसच्या हाती लागले आहे.

एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपाऱ्यात वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून गावठी बॉम्ब, जिलेटिन कांड्या, स्फोटक पदार्थ व पावडर, इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर इत्यादी गावठी बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. मात्र, हे बॉम्ब आणि स्फोटकांचे साहित्य नालासोपऱ्यात येण्यापूर्वी पुण्यात किरायाने राहत असलेल्या एका मुलाच्या घरी सुधन्वा गोंधळेकर याने तीन पिशव्यांत ठेवले होते. तेथून ते नालासोपाऱ्यात आणल्याचे दहशतवादविरोधी पथकाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबतचे पुण्यात जुलै महिन्यात गोंधळेकर, शरद कळसकर तसेच आणखी एक व्यक्ती स्फोटके आणि साहित्य नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज एटीएसच्या हाती लागले आहे.