धक्कादायक, तान्हुल्याचे पोट चिरून फेकले शेतात

0
473

बिहार, दि.२५ (पीसीबी) – एका तान्हुल्याचे पोट चिरून त्याला शेतात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परंतु दैव बलत्तर म्हणून या प्रकारानंतरही त्या तान्हुल्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील तारापूर गावातील ही घटना आहे

मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मुंगेर जिल्ह्यातील तारापूर गावात राहणारे कृष्णा तांती हे आपल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांची पत्नी घरातील काम करत असताना तान्हुला घराबाहेरच खेळत होता. परंतु काही वेळाने अचानक तान्हुल्याचा रडण्याचा आवाज ऐकून गावकरी धावत आले. त्यावेळी तो तान्हुला घरापासूनच काही अंतरावर असलेल्या शेतात जखमी अवस्थेत पडलेला दिसला. त्या तान्हुल्याचे पोट चिरून त्याला फेकण्यात आले होते. त्यामुळे त्याचे आतडे आणि आणि यकृत बाहेर आले होते. हा संपूर्ण प्रकार पाहून गावकऱ्यांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. दरम्यान, गावकऱ्यांनी त्वरित या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्या तान्हुल्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ऑपरेशन करून तान्हुल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहे.