धक्कादायक: चिंचवडमध्ये ३ वर्षीय चिमुकलीला अज्ञाताने दिले चटके

0
447

चिंचवड, दि. २ (पीसीबी) – चाळीमध्ये खेळत असताना अज्ञात इसमाने ३ वर्षीय चिमुकलीच्या पाठीवर, मांडीवर आणि हातावर चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि.३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड विद्यानगर येथील मोरे चाळीत घडली.

याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ३ वर्षीय चिमुकली ही आईसोबत चिंचवड विद्यानगर येथील मोरे चाळीत राहते. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास चिमुकली चाळीमध्ये खेळत असताना अज्ञात इसमाने तिच्या पाठीवर, मांडीवर आणि हातावर चटके देवून दुखापत केली. पिंपरी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.