देहूरोड रेडझोन हद्दीतील से.२२ चा नकाश अखेर प्रसिध्दी

0
1034

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – देहूरोड रेडझोन हद्दीतील से.२२ चा नकाशा अखेर आज प्रसिध्द करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार महापालिका नगरविकास विभागाने हा नकाशा नोटीस बोर्डवर लावला आहे. जेष्ठ नगरसेविका आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (क्र.१४-२०१७) दाखल केली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०१९ रोजी से. २२ क्षेत्राबाबत रेडझोनची मोजणी करून देण्याचा आदेश दिला होता. वर्क ऑफ डिफेन्स कायदा १९०३ नुसार देहूरोड दारुगोळा कारखान्याच्या सिमा भिंतीपासून २००० यार्ड मध्ये येणाऱ्या क्षेत्राचे सर्व्हेक्षण करून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ही मोजणी पूर्ण करण्यात आली आणि नकाशा प्रसिध्दा कऱण्यात आला आहे.

लष्कराच्या सिमा भिंतीपासून २००० यार्ड कुठपर्यंत येतात त्याची निश्चित हद्द या नकाशात दाखविण्यात आली आहे. या विषयावर ४ नोव्हेंबर २०२० रोजी जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयात एक विशेष बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे, नगररचना उपसंचालक रा. र. पवार, प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी बन्सी गवळी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहशहर अभियंता अशोक भालकर, देहूरोड डेपोचे कॅप्टन ध्रुव धंखा, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता निलेश मोढवे, सेंट्र्ल ऑर्डनन्स डेपो, देहूचे कमलेश, अप्पर तहसिलदार गीता गायकवाड, उप अधिक्षक हवेली शिवप्रसाद गौरकर, पिंपरी चिंचवड नगर भूमापन अधिकारी उमेश झेंडे, कनिष्ठ अभियंता प्रशांत गायकवाड हे उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी विषयाची माहिती देताना उच्च न्यायालयात याचिकाकर्त्या सिमा सावळे यांनी पीआयएल दाखल केली आहे, त्या अनुषंगाने जिल्हा भूमी अभिलेखा विभागाने मोजणी केली आहे, असे स्पष्ठ केले. ३० डिसेंबर २०१९ रोजी रितसर मोजणी करण्यात आल्याचे भूमी अधिकारी यांनी सांगितले. हा नकाशा संबंधीत यंत्रणांनी आपल्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच रेडझोन बाधित क्षेत्राच्या सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करावा आणि त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करावा असा आदेश स्वतः जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिला. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने आज हा नकाशा प्रसिध्द केला आहे.

https://www.easyzoom.com/imageaccess/1bcb896aaf1d4fb383b9996abb0011c4